कल्याण–डोंबिवली महानगरपालिका निवडणूक २०२५-२०२६
भारतीय जनता पार्टी
“आपली निशाणी: कमळ – प्रभाग क्र. २६ (ड)”
भाजपा – शिवसेना – रिपब्लिकन (आठवले गट)
महायुतीचे पॅनल प्रमुख उमेदवार
नमस्कार,
मी मंदार श्रीकांत हळबे
(Diploma in Electronics & Computer Hardware Technology)
कल्याण–डोंबिवली महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत प्रभाग क्रमांक २६ (ड) मधून भाजप–शिवसेना–रिपब्लिकन (आठवले गट) महायुतीचा अधिकृत उमेदवार म्हणून भारतीय जनता पार्टी (BJP) तर्फे निवडणूक लढवत आहे.
२०१९ ते २०२४ या कालावधीत प्रभागात राहून, नागरिकांच्या समस्या समजून घेणे, त्यावर प्रशासनाकडे पाठपुरावा करणे व विकासकामांसाठी प्रयत्न करणे या माध्यमातून मी सामाजिक कार्यात सक्रिय सहभाग घेतला आहे.
आपला विश्वास व प्रेम कायम राहो, हीच नम्र अपेक्षा.
आपलाच,
श्री. मंदार श्रीकांत हळबे
भाजपा – शिवसेना – रिपब्लिकन (आठवले गट)
महायुतीचे पॅनल प्रमुख उमेदवार
प्रभाग क्रमांक २६ (ड)
राष्ट्र प्रथम
आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या सक्षम, दूरदर्शी आणि निर्णायक नेतृत्वाखाली गेल्या काही वर्षांत भारताने जागतिक स्तरावर विश्वासार्ह आणि आत्मविश्वासपूर्ण राष्ट्र म्हणून आपली ओळख निर्माण केली आहे.
‘विकसित भारत २०४७’ हे स्वप्न आता केवळ संकल्प न राहता, प्रत्यक्षात साकार होण्याच्या दिशेने ठोस पावले टाकली जात आहेत.
राष्ट्रहित सर्वोच्च मानून, सुरक्षित, सक्षम आणि समृद्ध भारत घडवण्याचा प्रवास आज अधिक वेगाने पुढे सरकत आहे.
संघटन द्वितीय
भारतीय जनसंघापासून सुरू झालेला आणि आज भारतीय जनता पक्ष म्हणून विस्तारलेला हा प्रवास भारत माता हेच आराध्य दैवत मानून पुढे जात आहे.
राष्ट्रहित, सांस्कृतिक चेतना आणि समाजातील शेवटच्या घटकापर्यंत विकास पोहोचवण्याचा संकल्प घेऊन भारतीय जनता पक्ष सातत्याने कार्यरत आहे.
संघटनाची ताकद, कार्यकर्त्यांची निष्ठा आणि जनतेचा विश्वास हेच या प्रवासाचे खरे बळ आहे.
व्यक्ति अंतिम
राष्ट्रसेवा, जनकल्याण आणि भारतीय सांस्कृतिक मूल्यांवर आधारित वाटचाल करताना, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भारतीय जनता पक्ष परिवारातील थोर मार्गदर्शकांचे प्रेरणादायी मार्गदर्शन आमच्यासाठी सदैव दिशादर्शक ठरले आहे.
कार्यकर्त्यांची अखंड साथ आणि जनतेने दिलेला विश्वास
हाच आमचा सर्वात मोठा आधार आहे.
याच मजबूत पायावर उभे राहून, प्रभाग २६ ड च्या सर्वांगीण विकासासाठी आत्मविश्वासाने पुढील वाटचाल सुरू आहे.
कार्य व उपक्रम
माझ्या कार्यकाळात प्रभागातील खालील विषयांवर विशेष भर दिला आहे:
-
नागरी सुविधांचा पाठपुरावा
-
स्वच्छता, पाणीपुरवठा व रस्ते समस्या
-
आरोग्य, शिक्षण व सामाजिक उपक्रम
-
ज्येष्ठ नागरिक, महिला व तरुणांसाठी सहाय्य
-
प्रशासनाशी समन्वय साधून विकासकामे
या अनुभवाच्या जोरावर,
कल्याण–डोंबिवली शहराच्या सर्वांगीण विकासासाठी एक स्पष्ट आणि व्यवहार्य विकास आराखडा
तयार करण्याचा माझा मानस आहे.

आपली निशाणी – (कमळ)

आपली निशाणी – (कमळ)
कल्याण–डोंबिवली शहराच्या सर्वांगीण विकासासाठी दृष्टीकोन
“आपला पाठिंबा म्हणजेच आमची ताकद. चला, विकासाच्या मार्गावर एकत्र पुढे जाऊया.”
माझा दृष्टीकोन स्पष्ट आहे:
-
पारदर्शक व जबाबदार प्रशासन
-
मूलभूत नागरी सुविधा मजबूत करणे
-
पर्यावरणपूरक विकास
-
सामाजिक न्याय व समावेशक प्रगती
-
नागरिकांच्या तक्रारींवर तात्काळ उपाय
प्रभागातील प्रत्येक नागरिकाचा आवाज महानगरपालिकेत पोहोचवणे आणि त्यांच्या हितासाठी ठामपणे उभे राहणे हीच माझी प्राथमिकता आहे.

आपली निशाणी – (कमळ)

आपली निशाणी – (कमळ)
कार्य अहवाल – कार्यावलोकन
मतदारांना आवाहन
प्रभाग क्रमांक २६ (ड) मधील सर्व मतदार बंधू-भगिनींना नम्र आवाहन:
कमळ या निशाणीसमोरील बटन दाबून
महायुतीच्या पॅनलला प्रचंड मतांनी विजयी करा.
🗳️ मतदान दिनांक: गुरुवार, १५ जानेवारी २०२६
⏰ वेळ: सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३०

आपली निशाणी – (कमळ)

आपली निशाणी – (कमळ)
विकासकामांचा आढावा
“आपके कर्म, विचार शुद्ध होंगे, तो दुनिया आपकी और आप दुनिया के होंगे।”
– अटल बिहारी वाजपेयी
रस्ते व पायाभूत सुविधा
पाणीपुरवठा व स्वच्छता
वीज व स्ट्रीट लाईट
नागरी सुविधा
सामाजिक उपक्रम
(स्पर्धा परीक्षा, धार्मिक, सामाजिक, कोरोना, रक्षाबंधन, नववर्ष स्वागत यात्रा, इत्यादी.)
मतदारांना आवाहन
प्रभाग क्रमांक २६ (ड) मधील सर्व मतदार बंधू-भगिनींना नम्र आवाहन:
कमळ या निशाणीसमोरील बटन दाबून
महायुतीच्या पॅनलला प्रचंड मतांनी विजयी करा.
🗳️ मतदान दिनांक: गुरुवार, १५ जानेवारी २०२६
⏰ वेळ: सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३०

आपली निशाणी – (कमळ)

आपली निशाणी – (कमळ)
भाजपा कार्यालय – डोंबिवली पूर्व
जनतेसाठी सदैव खुले
भाजपा जनसंपर्क कार्यालय, डोंबिवली पूर्व हे नागरिकांसाठी एक विश्वासार्ह संपर्क केंद्र असून, येथे जनतेच्या समस्या समजून घेऊन त्या संबंधित विभागांपर्यंत पोहोचवण्याचा सातत्यपूर्ण प्रयत्न केला जातो. पारदर्शकता आणि जबाबदारी ही या कार्यालयाची प्रमुख वैशिष्ट्ये आहेत.


